भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो

shikava ho rukmai apuliya kanta | kan amhan anatha kashtavito

रचनाकार: संत राजाई · अभंग
शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ||१|| न्मोनियां आमुची पुरविली पाटी मोडिली राहाटी संसाराची ॥२॥ आतां आम्ही काय करणे माउलिये चै सालिये कवणाचिये ||३|| माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा क्षण जी वेगळा न करी त्यासी ||४|| आमुचा वेव्हार विध्वंसिला पाहीं । करुणा माझी कांहीं न ये त्यासी ||५|| सकळाचें मूळ आपणा आधीन केलें येणें जाणें पांडुरंगें।६।। आपुलें परायें मोहो हा सोडिला आंगोठा मोडिला उपाधीचा ॥७॥ उपधार लौकिक वेव्हार । धरिला निर्धार याचे नामीं ॥८॥ रात्रंदिवस जपे गोविंद हृदयीं । आमुची चिंता कांहीं नलगे त्यासी।।९।। तुमचे सन्निधानें जालो आम्ही दीन न वाटे निर्माण कैसे तुम्हां ॥१०॥ संसाराचिव्यथा नेणवे सर्वथा होय तें उचिता करणें आम्हां ।।११।। घरी निरंतर एकचि उत्तर परि हा तुम्ही विचार काय केला ॥१२॥ ा अनुभव अनुभवीं जाणें तुम्हीं समर्थपणें । सदासुखीं म्हणे नामीं तुझ्या || १३|| जन्मोनि अवधी तुमचीं पोसणीं । नेणो तुम्हांवांचोनि कोणी दुजें ।। १४ ।। कायावाचामनें तुमचिये पाईं। विनविते राजाई जिवलगा ।।१५।।