भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरधनि याण केला गुरू। बाई मी आतां काय करूं। असोनि नाहींसा संसारू। चमत्कार कृपेचा

gharadhani yan kela guru| bai mi atan kay karun| asoni nahinsa sansaru| chamatkar krupecha

रचनाकार: संत राजाई · अभंग
घरधनि याण केला गुरू। बाई मी आतां काय करूं। असोनि नाहींसा संसारू। चमत्कार कृपेचा || १ || धांवे पावे गे मेसाई येथें कोणाचें न चाले कांहीं। सत्यपण तुझे ठायीं तरी हैं नाहिसें करी गे ||२|| मंत्र घेतला जैसा। घरीं संताचा वोळसा वोस पडो हरिदासा। गेले नमत मागुते ||३|| काय सांगों याची रीती। सोसे सोसे पाये चरणाप्रती । अवघे भांबडभूत होती। नाचताती आनंदे ||४|| लौकिकांत गेलीं वायां । एकाच्या एक पडती पायां। म्हणती ये गा पंढरिराया। ब्रह्मानंदें डुल्लतां ||५|| भोळी सासू गोणाबाई। पांढरा स्फटिक व्याली पाही । त्यानें जोडिला शेषशायी काय राजाई करूं म्हणे ॥६॥