भजनी मालिका
← भजनांकडे परत

आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची

ai je shikavi titen tumhi naika nahin bhay shanka laukikachi

रचनाकार: संत राजाई · अभंग
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।। लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२|| ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।। धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें लावियेलें ।।४।। सुखाचा संसार करोनि बारा वाटे नांव केलें मोठे जगामाजीं ।।५।। तोडियेला मोह सांडियेली माया भुलविले तुमचिया चित्ता कोणें ।।६।। कवर्णे पुण्य ऐसी जोडियेली जोडी केली बिघडाबिघडी आम्हां तुम्हां।।७।। तुमचि हे गति लेकुरें नेणति । कोण चालविती घराचार||८|| म्हणोनि माझें चित्त आपुलेनि उद्वेगें। कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ।।९।। सर्वस्यें सांडोनि धरिला तुम्ही देव येणें पुसिला ठाव संसारींचा ||१०|| आमची कणव न वाटेचि कांहीं विनविते राजाई नामदेवा।।११।।