भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीर वरिवरि कां दंडिसि जंव

sharir varivari kan dandisi janv

शरीर वरिवरि कां दंडिसि जंव वारिलें न करी तुझें मन । जळीं नेत्र लाउनि टोकती अविंशा लागोनि तैसें नको नको बकध्यान करुं ॥१॥ चित्त सुचित्त करी मन सुचित्त करी । न धरी तूं विषयाची सोय । वनीं असोनी वनिता चिंतिसि तरि तपचि वाउगें जाय रया ॥२॥ त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळीं परि नवजाती मनींचे मळ । तुझियानि दोषें तीर्थ कुश्चित्त जाले जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥ आतां करिसी तरी चोखटची करी त्यासी साक्ष तुझें तुज मन । लटिकेंन झकवसी तर्‍ही देव दूर्‍हा होसी बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥