भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची

sharanagata nupekshi hari | aisi characharin kirti jyachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥ बिभीषणें नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामें ॥२॥ उपमन्या दुधाचा पैं छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥ ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥ ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनीं माउली ॥५॥