भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या

sharanagat aliya nupekshi sarvatha | aisa bodh chitta ahe majhya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥ सर्व भावें जावें नाम वाचे गावें । जिवलगा भेटावें विठोबासी ॥२॥ साधुसंत गाती आनंदें नाचती । क्षेम तयाप्रति द्यावें सुखें ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल । जन्ममरण निवारेल हेळामात्रें ॥४॥