भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्‍यांशीं

sharan geliyan santansi | tenen chukati chaur‍yanshin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्‍यांशीं ॥१॥ द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥ वंदितांचरणरज । पावन देह होती सहज ॥३॥ घालितां चरणीं मिठी । लाभ होय उठाउठी ॥४॥ प्रेमें दर्शन घेतां । मोक्ष सायुज्य ये हातां ॥५॥ म्हणे जनार्दन । एका लाधलीसे खुण ॥६॥