भजनी मालिका
← भजनांकडे परत

शम दम साधन । नामावांचुन न करीं जाण

sham dam sadhan | namavanchun na karin jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शम दम साधन । नामावांचुन न करीं जाण ॥१॥ नाम गावें नाम गावें । वेळोवेळां नाम गावें ॥२॥ नामावांचुनी साधन नाहीं । ऐसी वेदशास्तें देती ग्वाही ॥३॥ मज भरंवसा नामाचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा ॥४॥