भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें

shakar bhare mastakin vahile | ghar shakarilen namayachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥ दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथें ॥२॥ बिर्‍हाड तुर्ती माझें राउळाभीतरीं । विठूजी निर्धारी नाम माझें ॥३॥ तूमच्या नामयाची ममता मज असे फ़ार । एका जनार्दनीं निर्धारें ऋणी त्याचा ॥४॥