भजनी मालिका
← भजनांकडे परत

शहाणा हो म्हणविती । हरिभक्ति कां रे वरवर करिती

shahana ho mhanaviti | haribhakti kan re varavar kariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शहाणा हो म्हणविती । हरिभक्ति कां रे वरवर करिती ॥१॥ उगीच कासया करसील फड । जग हें बोधावया बापुडें ॥२॥ अंतर भक्ति न करिसी मूढा । कासया लौकिकीं मिरविसी बापुडा ॥३॥ एका जनार्दनीं धरूनी कान । संतापायीं नाचे सांदुनी अभिमान ॥४॥