भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्द निर्गुणें भावावें

shabda nirgunen bhavaven

शब्द निर्गुणें भावावें । थितिया सगुणासि मुकावें । वेदद्रोही व्हावें । कां ऐसें किजे । कर्म उच्छेदु करुन । अहंब्रह्म म्हणतां तिथिया सुखासी आंचविजे । कर्मचि ब्रह्म ऐसें जाणोनि दातारा । ह्रदयीं सगुण धरुनि राहिजे रया ॥१॥ जवळी असतां सांडी मांडी करिसि । वायां सिणसी तुझा तूंचि रया ॥२॥ मुळी विचारितां मन देह तंव । कर्माधीन तेथिचें संचित क्रियमाण प्रारब्ध पाहीं । तें ठेऊनि जडाचिया माथां । कीं वेगळें होऊनि पाहातां हें तव तुज नातळे कांहीं । ऐसें निरखूनी पाहातां सगुण धरुनि आतां । मग तुज विचारितां भय नाहीं ॥३॥ हा तंव कल्पनेचा उभारा । मनाचा संशय दुसरा । जेणें घडे येरझारा जन्मांतर । म्हणोनि ऐसें कां सोसावें । एकचि धरुनि राहावें । जेणें चुकती येरझारा । तेचि प्रीति जागृति स्वप्न आणि सुषूप्ति । ऐसाचि हो कां थारा । बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां । सुख अंतरीं जोडेल सोयरा ॥४॥