भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तूं जाय । तीर्थयात्रेकारणेकं

savadhan sarva ahe | tujhe hat ani pay | tonvarin tun jay | tirthayatrekaranekan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तूं जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥ सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥ डोळे कान नाक आहे । तोंवरी संतां शरण जाय । हीं मावळलीया होय । हाय हाय तुजलागीं ॥३॥ काय म्हणशी माझें माझें । हें तों शेवटींचें वोझें । एका जनार्दनीं दुजें । तुज कोण सोडवील ॥४॥