भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन

savadh pahatan tumhin dnyanachen adnyan | manun tochi mhane mahanta mahadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥ ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥ नश्वर देह म्हणती ज्ञानेंच निंदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणे फुंजें ॥३॥ सच्चिदानंद माया या नांवें । याहुनी परती स्थिति तें तें ज्ञान जाणावें ॥४॥ एका जनार्दनीं अनुतापाची गोडी । ज्ञानाज्ञानाची तोडोनि सांडिली बेडी ॥५॥