भजनी मालिका
← भजनांकडे परत

साउमा जंव जाये तंव ह्रदयींचा आहे

sauma janv jaye tanv hradayincha ahe

साउमा जंव जाये तंव ह्रदयींचा आहे । चित्त विकासु पाहे चित्तामाजी ॥१॥ तंव चतुर्भुज हरि ह्रदयमंदिरीं । तया नमन करी विज्ञानेसी ॥२॥ शांति धरुनि बाही आपेंआप पाही । मननीं निर्वाही न्याहाळिला ॥३॥ ज्ञानदेवा रुप बिंबोनी । समीप प्रपंचदु:ख सुख जालें ॥४॥