भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी

satya kari apulen vachan | amuchen karin bandhamochan | amuchen vipattichen vidhan | savadhan avadhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥ इंद्रबारी चंद्र कर्‍हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥ अश्विनी देव दोन्हीं । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥ मारको केली तरळी । सटवी बाळातें पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥ मैराळ देव कानडा । करी राक्षसांच्या दाढ । आरसा न दाखवी ज्यापुढा । तो रोकडा बुकाली ॥५॥ विघ्न राहुं न शके ज्यापुढें । तो गणेशबापुडें । गाढवांचें कळप गाढे । एका जनार्दनीं वळीत ॥६॥