भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण

satya dnyananand gaganachen pravarna

सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रुप वर्ण गुण जेथे ॥१॥ तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी । पाहते पाहणें दुरी सारोनिया ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योती । ते हे उभी मूर्ती विटेवरी ॥३॥