भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संतआज्ञा

satya bhola dev krupecha sagar | na modi uttar santaadnya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संतआज्ञा ॥१॥ भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी । स्वीकारी आवडी आपुलिये ॥२॥ अनन्य प्रीतीचें तुळसीपत्र जळ । मानी सर्वकाळ तृप्ती तेणें ॥३॥ निळा म्हणे त्याचा करी बहुमान । अनाथ म्हणऊन सांभाळी त्या ॥४॥