भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली

sattva raj tam gele nirasoni | drushyachi lavani kaishi jhali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥ गेलिआ माघारीं पाहतां न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥ अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । प्रकाशतां अंतरीं लखलख ॥३॥ एका जनार्दनीं प्रकाश संपुर्ण । सर्व नारायण बिंबलासे ॥४॥