भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी

satpad ten brahma chitpad ten maya | anand padin jaya mhanati hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१॥ सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सादिति ऐसे पैल वस्तुवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ति भोळ्यां भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशी पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥