भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता

sarvathayin jyachi satta | to bhaktadhin tattvata

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥ ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥ आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥ ज्याचें आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥ जो सर्वांसी आधार । एका जनार्दनीं विश्वभंर ॥५॥