भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण

sarvasva haruni mhanasi balisi | myan bandhilen vicharise kon kon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण ॥१॥ द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥ ऐसें नाथिलेंसी आपणा गोंविसी । एका जनार्दनीं बोल आम्हां कां ठेविसी ॥३॥