भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये

sarvanghatin bimboni thela | to ha ala pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये ॥१॥ सर्वांघटीं ज्यांची वस्ती । ते हीं मूर्ति विटेवरी ॥२॥ सर्वांठायीं भरूनि उरे । पंढरीये पुरे मापासी ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । धन्य पेणें पंढरी ॥४॥