भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांग देखणा हाचि भावो जाण

sarvang dekhana hachi bhavo jan

सर्वांग देखणा हाचि भावो जाण । येर निराकारणें वाया वोझें ॥१॥ शक्तीचा पडिभरु वाहासिल माथा । श्रीगुरुपायां शरण जाई ॥२॥ नसंडी वेदसिंधु सांडी मांडी कर्म । उपाधीचा धर्म करुं नको ॥३॥ बापरखुमादेविवरदेखणा सर्व दृष्टी । तेथें प्रपंच गोष्टी मुरलिया ॥४॥