भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया

sarvambhutin daya | sadhu mhanaven aishiya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥ जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥ सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं संत । नित्य साधी आत्महित ॥४॥