भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि

sarvakal sukh ramanamin | aisa jyacha deh dhanya tochi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥ जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥ एका जनार्दनीं ध्यानीं मनीं । श्रीरामावांचुनीं आन नेणें ॥३॥