भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ खंती वाटे । कैं तो भेटे मज आतां

sarvakal khanti vate | kain to bhete maj atan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वकाळ खंती वाटे । कैं तो भेटे मज आतां ॥१॥ न लोटे पळ युगा ऐसें । रात्री दिवसें सम झालीं ॥२॥ करुणामुखें भाकी कींव । ये वो ये वो म्हणउनी ॥३॥ निळा म्हणे जाणवा मात । तुम्ही संत एकांती ॥४॥