भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप

sarvabhutin tujhen rup | hrudayin siddhachi svarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप ॥१॥ इतुलें देईं अधोक्षाजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥ सकळांहुनी कई सान । सकळिका समसमान ॥३॥ सदा द्यावा संतसंग । अखंड कीर्तनीं अनुराग ॥४॥ निःशेष दवडोनियां स्वार्थ । अवघा करीं परमार्थ ॥५॥ एका जनार्दनीं मागें । नाहीं तरी घाला घालीन अंगे ॥६॥