भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें

sarvabhaven das jhalon mi udas | todila mayapash janardanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥ माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥ रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥३॥ बांधलों होतो मायाममतेच्या पाशीं । तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥ एका जनार्दनीं उघडा बोध दिला । तोचि ठसावला हृदयामाजीं ॥५॥