भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें

sarva parvakal datta vadatan vache | anik sayasachen mul khunten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥ काळ वेळ कांहीं न लगे तत्त्वतां । नाम उच्चिरितां दरुशनं ॥३॥ भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भवताप दरुशनें ॥५॥