भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी

sarpe dhavoni dharilya tondin | sarvanga ghalitase bedi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥ सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥ रिघतां सदगुरुसी शरण । तैसें निरसे जन्ममरण ॥३॥ संसार सर्प मिथ्या देहीं । एका जनार्दनीं सदा ध्याई ॥४॥