भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्तपुर्‍यांमांजीं पढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती

saptapur‍yammanjin padhari pavan | namaghosh jan vaishnav kariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सप्तपुर्‍यांमांजीं पढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥ देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचेम म्हणतां ॥२॥ आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान टाकुनियां ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठला वांचुनी । आन नेणें मनीं दुजें कांहीं ॥४॥