भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ

sapremen karitan bhajan | tenen ghadati koti yadnya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ॥१॥ प्रेम सार प्रेम सार । वायां भार कुंथेचा ॥२॥ प्रेमेंविण न भेटे देवो । अवघा वावो पसारा ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम सार । तुटे वेरझार येणें जाणें ॥४॥