भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी

saprem nachoni vajava tali | garja harikatha namavali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी ॥१॥ ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडी ॥२॥ सेवितां कथामृतसार । दीनवदनें दिसे संसार ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम । स्वयें सांगें पुरुषोत्तम ॥४॥