भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे

santavachoniyan sukh kothen nahin | amrut tyanche payin nitya vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥ संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥ दुर्जनाचे संगें दुःख प्राप्त होय । तेथें कैंचि सोय तरावया ॥३॥ एका जनर्दनीं हेंचि सत्य साचा । नको अभक्तांचा संग देवा ॥४॥