भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी

santaseva kelyapathin | kainchi sansarachi goshti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥ तेथें कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥ कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणी मन ॥३॥ कैंचा भेद कैंचे भान । एक जनार्दनीं ध्यान ॥४॥