भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगें हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्चळ

santasangen hare pap | santasange nirase tap | santasange nirvikalpa | hoy manas nishchal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतसंगें हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्चळ ॥१॥ संतसंगे वैराग्य घडे । संतंसगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयीं अखंडित ॥२॥ संतसंगे हरिची भक्ति । संतसंगें ज्ञानविरक्ति । संतसंगें भुक्तिमुक्ती । साधकां वरिती अनायासें ॥३॥ निळा म्हणे साधुसंगे । महाभाग्याचें हें भाग्य । सेविती ते स्वरुप चांग । पावती आत्मया श्रीहरीचें ॥४॥