भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसनकादिक देव । भेटावया आले सर्व

santasanakadik dev | bhetavaya ale sarva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतसनकादिक देव । भेटावया आले सर्व ॥१॥ देवा भक्तांते पूजितीं । महिमा अदभुत तो वर्णिती ॥२॥ पावन केली पुंडलिकें । म्हणती नरनारी बाळकें ॥३॥ निळा ऐकोनियां वाणी । मिठी घालूं धांवे चरणीं ॥४॥