भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे

santapotin dev vase | deva potin sant ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥ ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥ संतांठायीं देव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥३॥ एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥४॥