भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती

santanchi jo ninda karito chandal | pratyaksha amangal hin yati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥ तयाचें वचन नायकावें कानीं । हो कां ब्रह्माज्ञानीं पूर्ण ज्ञाता ॥३॥ एका जनार्दनीं ऐसे जे पामर । भोगिती अघोर रवरव नरक ॥४॥