भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती

santanche sangati | pap nure ten kalpanti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥ तीर्थ व्रत जप दान । अवघें टाका वोवाळुन ॥३॥ संतचरणींचे रजःकण । वंदी एका जनार्दन ॥४॥