भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा अनुभव संतची जाणति । येर ते हांसती अभाविक

santancha anubhav santachi janati | yer te hansati abhavik

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
संतांचा अनुभव संतची जाणति । येर ते हांसती अभाविक ॥१॥ नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणें जन्म मरण जेणे खुंटविलें ॥२॥ सेवेचा प्रकार जाणे हनुमंत । तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥ सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली । ऐक्य रूपें चाली मिरवली ॥४॥ चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । तेथें मी पामर काय वानूं ॥५॥