भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव

santadarushanen labh hoy | aisa ahe anubhav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥ पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥ यातिकुळ हो कां भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥