भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं

santachiya mathan charananvari majha | dehin bhav duja nahin nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥ नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥ मायबाप म्हणो तरी लाजिरवाणें । चुकविलें पेणे संतजनीं ॥३॥ ज्या ज्या जन्मा जावें मायबाप दोन्हीं । परी संतजन निर्वाणी मिळतीना ॥४॥ येचि देहीं डोलां संताची देखिलें । एका जनार्दनीं वंदिलें चरण त्यांचे ॥५॥