भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा

santachen charan dhyatan | harapali janmavyatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥ पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥ संतसमुदाय दृष्टी । पडतां लाभ होय कोटी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । काया कुर्वडीं संतचरणीं ॥४॥