भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं

santacharanaraj vandunin tattvatan | sayujya bhakti mathan pay deun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥ थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥ संतापरतें दैवत नाहीं जया चित्तीं । तोचि एकपुर्णस्थिति ब्रह्माज्ञानीं ॥३॥ संत तोचि देव जयांची वासना । एका जनार्दनीं भावना नाहीं दुजीं ॥४॥