भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें

santabheticha anandu | sukhasagar paramanandu | gatan nurechi bhedu | namasmaranen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥ भुक्ति आणि मुक्ति । सदा तिष्ठे अहोरातीं । कैवल्यपद येती । सामोरी तयासी ॥३॥ नाम गाती जे आनंद । हृदयीं नहीं दुजा भेद । एका जनार्दनीं छंद । तयांच मज ॥४॥