भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे

santaankin dev vase | devaankin sant baise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे ॥१॥ ऐशा परस्परें मिळणी । समुद्र तरंग तैसें दोन्हीं ॥२॥ हेम अलंकारवत । तैसे देव भक्त भासत ॥३॥ पुष्पीं तो परिमळ असे । एका जनार्दनीं देव दिसे ॥४॥