भजनी मालिका
← भजनांकडे परत

संता वाचुनिया सुख कोठे नाही

santa vachuniya sukh kothe nahi

रचनाकार: संत बोधले · अभंग
संता वाचुनिया सुख कोठे नाही । अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥१॥ संताचे संगती होय मोक्ष गती । नको बा संगती दुर्जनांची ॥ २॥ दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय । तेथे कैची सोय तारावया ॥३॥ बोधला म्हणे सत्य हे त्रिवाचा । नको अभक्तांचा संग देवा ॥४॥