भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत उपाधिरहित । नाहीं तया दुसरा हेत

sant upadhirahit | nahin taya dusara het

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत उपाधिरहित । नाहीं तया दुसरा हेत ॥१॥ सदा मुखीं नाम वाचे । तेणें जन्माचें सार्थक ॥२॥ संग नावडे तयां कांहीं । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । ध्यानीं मनीं संत आठवीत ॥४॥