भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत केवळ घातकी पाही । परी त्यासि पातक नाहीं

sant keval ghataki pahi | pari tyasi patak nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत केवळ घातकी पाही । परी त्यासि पातक नाहीं ॥१॥ निजबोधाचे करुनी फांसे । दोघे गोसावी मारिले कैसे ॥२॥ अती खाणोरिया कर्म करी । दिवसां जाळिले गांव चारी ॥३॥ एका जनार्दनीं घातकी मोठे । त्यासी अंतक केवी भेटे ॥४॥